---Advertisement---
अमळनेर गुन्हे

खळबळजनक : गॅस भरताना चारचाकीने घेतला पेट, अनर्थ टळला पण चारचाकी खाक!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यात अवैधरित्या गॅस भरणा अनेक ठिकाणी सुरू असून आज एक धक्कादायक घटना अमळनेरात घडली आहे. अमळनेरच्या बस स्टँड जवळ खासगी चारचाकीमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरत असतांना अचानक लागलेल्या आगीत चारचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

4 wheeler on fire

अमळनेर शहरात अनेक वाहने ही बेकायदेशीररित्या घरगुती गॅस वाहनात भरततात. बहुतांशी अवैध वाहतूक करणारे चालकच ही युक्ती वापरतात. अश्याच प्रकारे एका चारचाकीत गॅस भरत असताना अचानक आग लागल्याने पाहता पाहता कार जाळून खाक झाली. मंगळवारी अमळनेरात बसस्थानक परिसरात ही घटना घडली. सुदैवाने कुठलाही अनर्थ घडला नाही. या आगीत गाडी जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत पोलिसांत आगीची नोंद करण्याचे काम सुरु होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---