---Advertisement---
बातम्या

आदिशक्ती मुक्ताईच्या दान पेट्यांचा पैसा जातो कुठे? – आमदार चंद्रकांत पाटील

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । उंबरा ते जोंधणखेडा आणि मच्छिंद्रनाथ मंदिर असा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार करण्यात आला आहे. तीन कोटी चाळीस लक्ष रुपयांचे काम मंजूर असतून भ्रष्टाचार झालेला नाही. खडसेंची मानसिकता खराब झाली आहे. असा टोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आदिशक्ती मुक्ताईच्या दान पेट्यांचा पैसा कुठे जातो? असा सवाल त्यांनी खडसेंना यांना विचारत तुमचा भाचा कुठे अडकला? याचे उत्तर जनतेला द्यावे, असे सांगून त्यांनी खडसेंचे आरोप केवळ आपल्या भाच्याची बदनामीसाठी असल्याचे पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.

eknath khadse chandrakant patil jpg webp

पाच कोटींचा निधी आपण परत पाठवल्याच्या वृत्ताला आमदारांनी दुजोरा देत त्यातील अडीच कोटी रुपयांचा निधी केवळ खडसे यांच्या शैक्षणिक संस्था व मंगल कार्यालयाच्या उपयोगासाठी आणण्यात येणार होता, असेदेखील सप्ष्ट केले. गोदावरी मंगल कार्यालयाचे बांधकाम खासदार व आमदार निधीतून करण्यात आले असून या मंगल कार्यालयातून वर्षभर येणारे भाडे तत्वावरील उत्पन्न हे स्वतःच्या खिशात खडसे घालत असून हा खरा भ्रष्टाचार असल्याचा आरोप आमदारांनी केला. आदिशक्ती मुक्ताईच्या दान पेट्यांचा पैसा कुठे जातो? संत निवासाच्या उपयोग कुणासाठी केला जातो? तुमचा भाचा कोणत्या प्रकरणात अडकलेला आहे हे सर्वांना माहित आहे, असेही आमदार म्हणाले.

प्रत्यक्षात मुख्यमंत्री मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माझ्या आमंत्रणावरून येत आहेत हे त्यांना पचनी पडत नसून त्या असून आसुयेपोटी ते आरोप करीत असल्याचे ते म्हणाले. स्वतःच्या घरात आमदारकी-खासदारकी एव्हढे असताना परत तुम्हाला स्वतःच्या कुटुंबात आमदारकी मिळावी यासाठी तुमचा खटाटोप सुरू आहे. त्या ऐवजी खडसे यांनी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांना विधान परीषदेवर आमदारकी दिली असती तर त्यांचा मोठेपणा सिद्ध झाला असता, असे आमदार म्हणाले.

---Advertisement---

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतरही खडसे यांनी चकार शब्द त्याचा निषेध न केल्याने हा अधिकारी तुमचा तर बगलबच्चा नव्हे ना? असा आरोपही आमदारांनी करीत या द्वेष भावनेतून तुमची विशिष्ट समाजा संदर्भात मानसिकता काय? हे दिसून येते, असेही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---