---Advertisement---
महाराष्ट्र कृषी

शेतकऱ्याच्या कापसाला कधी मिळणार भाव ? वाचा तज्ज्ञांचे मत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ जानेवारी २०२३ | कापसाचे दर वाढतील, या अपेक्षेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल अजून बाजारात आणलेला नाही. याचा प्रत्येय एका आकडेवारीमुळे आला आहे. आकडेवारी अशी कि, दरवर्षी जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात १० लाख गाठींपर्यंत कापसाची खरेदी दरवर्षी होत असते. मात्र, यंदा केवळ ४ लाख गाठींपर्यंत कापसाची आवक झाली आहे.

cotton market jpg webp webp

भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. ते अजूनही चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र तो मिळेल कधी ? हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र शेतकरी फक्त आस लावून बसला आहे. (when will cotton prise will rise)

---Advertisement---

गेल्या वर्षी कापसाचे दर १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र, बाजारात नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर कापसाचे दर वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झालेले नाही. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर मुहूर्ताचा दर मोठ्या प्रमाणात देण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात आवक सुरू झाल्यानंतर कापसाच्या दरात घट झाली. कापसाच्या दरात वाढ होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणलेलाच नाही.

कापूस व्यवसायातील काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातून कापसाची निर्यात अजून सुरु झालेली नाही. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या मालापेक्षा इतर निर्यातदार देशातील कापूस कमी दराने मिळत असल्याने इतर आयातदार देशांकडून भारताच्या कापसापेक्षा इतर देशातून माल खरेदी आहेत. त्यामुळे सध्याचेच दर कायम राहण्याचा अंदाज आहे.

गेल्यावर्षी कसे होते कापसाचे भाव?
जानेवारी १००००
फेब्रुवारी ११०००
मार्च ११०००
एप्रिल १०५००
में १०८००
जून ११३००
जुलै १११००
ऑगस्ट ११२००
सप्टेंबर ९५००
ऑक्टोबर ८२००
नोव्हेंबर ७५००
डिसेंबर ८३००

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---