⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तुरीचे मोठे नुकसान!

अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तुरीचे मोठे नुकसान!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । रावेर तालुक्यातील ढगाळ वातावरण निर्माण होऊन सर्वदूर पाऊस झाला आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जात आहे.

गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन सर्वदूर पाऊस झाला आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू हरभरा या रब्बी पिकांसह खरिपातील तुरीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी रावेर शहरासह, ग्रामीण भागातील, कर्जोद, खानापूर, वाघोड, अहिरवाडी, मोरगाव, पाल परिसर, तांदलवादी,परिसर, निभोरा परिसरात आदींसह अनेक ठिकाणी नुकसान झालेल्या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून केली जात आहे.

रावेर तालुक्यात बुधवारी मध्य रात्रीपासून जोरदार अवकाळी पाऊस झाला, आजघडीलाही ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वातावरणामुळे खरिपातील काढणीला आलेले हरभरा पीक उध्वस्त झाले असून, वादळी वाऱ्याने गहू, हातभार जमीनदोस्त झाला आहे. पाऊस पडत असल्याने हरभरा हाती येण्यापूर्वी नष्ट होत आहे. तसेच गहू पूर्ण आडवा झाला आहे, आमचे आर्थिक नुकसानच होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याच बरोबर तालुक्यात भाजीपाला, आंबा आणि इतर फळ पिकांच्या बहरावर विपरित परिणाम होणार असल्याचे चित्र सध्याच्या वातावरणावरून दिसते आहे.

पेरणीसाठी केलेला खर्चही निघणे मुश्किल – गुणवंत सातव वाघोड

२.५ एकरावर गव्हाची पेरणी केली, आणि हरभरा सुद्धा घेतला. सुरुवातीला जमिनीतील उष्णतेमुळे पिके करपली, त्यानंतर पाणी दिल्याने पिके कशीतरी जगली. मात्र हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या वेळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपातील उर्वरित पिके खराब होईल म्हणून कापून ठेवली. ती भिजून नुकसानीत आली तर गहू आडवा पडल्याने दाणे भरण्याची ताकत कमी होऊन उत्पादन घटणार आहे. हरभरा काळा पडल्याने त्यातही घट होऊन पेरणीसाठी केलेला खर्चही निघते कि नाही..? याची चिंता लागली असल्याची माहिती शेतकरी गुणवंत सातव यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह