वाणिज्य

SIP चा एकही हप्ता भरणे चुकल्यास फंडावर काय परिणाम होईल? घ्या जाणून..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । सध्याच्या घडीला बरेच जण बँक FD पेक्षा म्युच्युअल फंडात म्हणजेच SIP मध्ये गुंतवणूक करणे पसंत करत आहे. कारण SIPमध्ये बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळते. मात्र जेव्हा तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात करता तेव्हा त्यात नियमितता राखणे आवश्यक असते. विशेषत: जेव्हा तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP रे गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासाठी त्यात शिस्त असणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण आपली बचत योग्य ठिकाणी गुंतवण्याचा हा एक मार्ग आहे ज्यात निष्काळजीपणा अजिबात चालत नाही. यावर तुमच्या मनात एक प्रश्न उद्भवू शकतो की जर तुम्ही SIP हप्ता भरणे चुकले तर तुमच्या निधीवर काय परिणाम होईल?

तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक आधारावर SIP हप्ता भरू शकता. त्याच वेळी, यासाठी तुम्हाला ऑटो डेबिट किंवा सेल्फ पेमेंटचा पर्याय देखील मिळेल. अशा परिस्थितीत, जर तुमच्या एसआयपीशी जोडलेल्या बँक खात्यात पैसे नसतील किंवा तुम्ही कधी हप्ता भरण्यास चुकलात तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

SIP योजना रद्द केली जाऊ शकते
तज्ञांच्या मते, जर तुम्ही SIP चे एक किंवा दोन हप्ते चुकवले तर त्याचा तुमच्या फंडावर परिणाम होत नाही. परंतु तुम्ही सलग तीन हप्ते न भरल्यास फंड हाऊस तुमची एसआयपी योजना रद्द करू शकते. तथापि, एकदा किंवा दोनदा हप्त्याची पुनरावृत्ती करूनही फंड हाऊस तुमची SIP योजना रद्द करू शकते. ECS नियमांनुसार, फंड हाऊसला डेबिट विनंती किमान तीन महिने अगोदर पाठवणे आवश्यक आहे.

दंड भरावा लागेल
एसआयपीचा हप्ता वेळेवर न भरल्यामुळे अनेक फंड हाऊसेस ग्राहकांवर कोणताही दंड आकारत नाहीत, परंतु जर तुम्ही बँकेच्या एसआयपी योजनेत गुंतवणूक केली असेल, तर बँका दंड आकारण्यात कधीही चुकत नाहीत. दंडाची रक्कम बँकेनुसार बदलते. उदाहरणार्थ, ICICI बँक मासिक SIP हप्ता चुकवल्याबद्दल 350 रुपये दंड आकारते.

बँक खात्यात पैसे नसल्यास काय करावे
जेव्हा तुम्हाला माहित असेल की तुमच्या बँक खात्यात काही काळासाठी पैसे नसतील आणि एसआयपीचा हप्ता येणार आहे, तेव्हा तुम्ही काही काळासाठी एसआयपी थांबवू शकता. यासाठी तुम्ही संबंधित कार्यालयात जाऊन ऑनलाइन विनंती करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला SIP हप्ता भरण्याच्या तारखेपूर्वी पावले उचलावी लागतील. कारण या प्रक्रियेला 10 दिवस ते 30 दिवसही लागू शकतात. तथापि, सर्व फंड हाऊस ही सुविधा देत नाहीत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button