जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या तरुणीची प्रकृती खालावल्याने महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे मदत मागण्यात आली. मात्र, आपण केव्हाही फोन कराल का? दिवसा आणि कार्यालयीन वेळेतच फोन करा. असे अजब उत्तर अधिष्ठातांनी दिल्याने, हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, याबाबतची फोन रेकॉर्डिंग माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा येथील एका तरुणीने चुकून फिनाईल पिल्याने तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. दरम्यान, या तरुणीची प्रकृती खालावल्याने तरुणीच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. गुप्ता यांनी रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.
त्यानंतर गुप्ता यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद फुलपाटील यांना मदतीसाठी फोन केला. त्यावेळी डॉ. फुलपाटील यांनी ‘आपण केव्हाही फोन करता का?, दिवसा आणि कार्यालयीन वेळेतच फोन करा. असा सल्ला दिला. इतकंच नव्हे तर गुप्ता यांनी आपण डीन आहेत असे सांगितले असता डीन हूं तो क्या? कुछ भी कर सकता हू क्या? असा प्रश्न अधिष्ठाता यांनी केला. याबाबतची फोन रेकॉर्डिंग दीपककुमार गुप्ता यांनी व्हायरल केली आहे.
ऐका काय म्हणाले वैद्यकीय अधिष्ठाता :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1270568216773438/