जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावहुन पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोणी शिक्षणासाठी पुण्यात जातं, तर कोणी नोकरी, व्यवसायासाठी जळगावहू पुण्याला जातात. खरतर जळगाववरून पुणे येथे जायला रेल्वे, बस किंवा विमानने जाता येते. विमानने जायला कमी वेळ लागतो, पण ते थोडे महाग असते. रेल्वेने जायला जास्त वेळ लागतो, पण ते स्वस्त आहे. बसने सुद्धा जायला वेळ लागतो.

रेल्वे सेवा उपलब्ध

जळगावहुन पुण्याला जाण्यासाठी नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहे. झेलम एक्सप्रेस, गोवा एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, हुतात्मा, आझाद हिंद यासह इतर रेल्वे गाड्या जळगाव स्थानकांवरून पुण्याला जातात. रेल्वेने साधारणपणे ७-८ तास लागतात. रेल्वच्या स्लीपरचे तिकीट दर २८० ते ३२० रुपये इतके आहे. तर एसीने प्रवास करायचं म्हटल्यास तुम्हाला ७५० ते ८२० रुपयांपर्यंत खर्च येईल.

बसने

जळगाव बस स्थानकातून पुण्याला जाण्यासाठी अनेक बसगाड्या उपलब्ध आहेत. तुम्ही एसटी महामंडळाच्या (MSRTC) किंवा खाजगी बसने प्रवास करू शकता. एसी, नॉन-एसी, स्लीपर किंवा सीटर अशा विविध प्रकारच्या बसेस मिळतील. तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार तुम्ही बस निवडू शकता. बसने जायला साधारणपणे ८-९ तास लागतात. जळगाव ते पुणे अंतर जवळपास ३८० ते ४०० किमी इतके आहे बसचे तिकीट ऑनलाइन किंवा बस स्थानकातून खरेदी करता येते.
बसचे किती दर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सामान्य नॉन-एसी बसचे तिकिट ६१५ ते ७२४ किंवा त्याहून अधिक असू शकते, तर एसी शिवशाही बसचे तिकीट साधारणपणे ८८० च्या आसपास असते. सध्या खाजगी बसने जाण्यास म्हटलं तर तुम्हाला साधारण ७०० ते ९०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करावा लागेल.
विमान प्रवास

जर तुम्हाला लवकर जायचे असेल, तर तुम्ही जळगाव विमानतळावरून पुण्याला जाण्यासाठी विमानानेही प्रवास करू शकता. विमानाने प्रवास करायचं म्हटल्यास तुमहाला २९०० ते ४००० रुपयापर्यंतचा खर्च येईल. जळगाव विमानतळावरून पुण्यासाठी विमान दुपारी २ वाजून १५ ला उड्डाण भरते तर पुण्याला ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटाने पोहोचेल.
इतर पर्याय:

तुम्ही टॅक्सी किंवा प्रायव्हेट कारनेही प्रवास करू शकता. कार जवळपास जळगाव ते पुण्याला जाण्यासाठी ६ ते ७ तास लागतात. तुम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 चा वापर करून जळगावहून पुण्याला जाऊ शकतात. या मार्गावर जामनेर, पहूर, अजिंठा, संभाजीनगर, अहमदनगर आदी शहर लागतात.पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून (Expressway) जळगाव-पुणे प्रवास करणे सोपे आणि जलद आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि बजेटनुसार योग्य पर्याय निवडू शकता.






