जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. जळगावहुन मुंबईत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिक्षण, नोकरी, उद्योग तसेच सरकारी कामांसाठी अनेक जण मुंबईला जातात. जळगावहून मुंबईला जाण्यासाठी तुमच्याकडे विमान, रेल्वे आणि बस असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

रेल्वेनं प्रवास

जळगाव रेल्वे स्थानकातून मुंबईसाठी नियमित गाड्या उपलब्ध आहेत. तुम्ही जळगावहुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर किंवा मुंबई सेंट्रल स्थानकांवर जाणाऱ्या गाड्या पकडू शकत. वेळापत्रकानुसार योग्य गाडी निवडा. जळगावहून मुंबईसाठी ६ ते ६. ३० तासाचा प्रवास आहे. जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करत असाल, तर २८५ ते ३०० रुपये त्याहून अधिक असू शकते. तर एसीचे भाडे ७०० ते ७५० रुपये इतके आहे.

बससेवा उपलब्ध

जळगावहून मुंबईसाठी अनेक बससेवा उपलब्ध आहेत. तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) किंवा खाजगी बस कंपन्यांच्या बसेसने प्रवास करू शकता. महामंडळाच्या बसेचे भाडे सुमारे ५५५ ते ६५० रुपये आहे. तर सध्या खासगी बसचे भाडे ६०० ते ९०० रुपयांपर्यंत आहे.
कारने प्रवास

जळगाव ते मुंबई अंतर सुमारे ४८० किमी असून राष्ट्रीय महामार्ग १६० (NH160) आणि NH ५३ & ६० चा वापरून करून कारने प्रवास करता येतो. हा प्रवास साधारणपणे 7-8 तासांचा असतो. महामार्ग ५३ हा एरंडोल, पारोळा, धुळ्यापर्यंत आहे. धुळ्यापासून महामार्ग ६० चा वापर करून प्रवास करता येतो. समृद्धी महामार्गाचा वापर करूनही मुंबई प्रवास करता येईल.
इतर:
तुम्ही विमानसेवेचा पर्याय देखील निवडू शकता, पण सध्या जळगाव विमानतळावरून मुंबई सेवा सुरु नाहीय. तर तुम्हाला जवळच्या विमानतळावरून (औरंगाबाद) मुंबईसाठी विमान पकडावे लागेल.
स्थानिक ट्रान्सपोर्ट

मुंबई येथे पोहोचल्यावर स्थानिक ऑटो, टॅक्सी किंवा बसने तुमचा अंतिम ठिकाणापर्यंत सहज पोहोचता येतो.







