ठरलं! अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळणार ‘ही’ खाती?

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार पार पडला नाहीय. यातच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असताना अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या अनेक नेत्यांच्या इच्छेवर विरजण पडलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली, त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याची चर्चा सुरु झाली. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह जलसंपदा किंवा महसूल हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे.

संभाव्य मंत्रिपदे कोणती?
अजित पवार : जलसंपदा किंवा महसूल
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा किंवा ओबीसी कल्याण
दिलीप वळसे पाटील : ऊर्जा
हसन मुश्रीफ : कौशल्य विकास
धनंजय मुंडे : गृहनिर्माण
आदिती तटकरे : महिला व बालकल्याण
संजय बनसोडे : पर्यटन
अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण
धर्मरावबाबा आत्राम : आदिवासी कल्याण

दरम्यान राज्यपालांची सही झाल्यानंतर अधिकृतरित्या खाते वाटप जाहीर केलं जाणार आहे. मात्र, जी मंत्रिपदं शिवसेना आणि भाजपमधील आमदारांना मिळणार होती, ती आता अजित पवार यांच्या गटाला मिळण्याची शक्यता असल्यचां म्हटलं जात आहे. यातूनही अनेक आमदारांची नाराजी हळूहळू समोर येऊ लागली आहे.