जळगाव लाईव्ह न्यूज। १४ ऑगस्ट २०२३। आरोग्य भारती पश्चिम क्षेत्र पर्यावरण कार्यशाळा दि. १४ ऑगस्ट रोजी आय. एम. ए. हॉल येथे पार पडली. मंचावर प्रमुख अतिथी व द्वीप प्रज्वलन पद्मश्री adv. उज्वल निकम. श्री. प्रवीणजी प्रभाकर पर्यावरण प्रमुख,
श्री. मिलिंदजी जोशी राष्ट्रीय महासचिव ,सौ. अनुराधा नरवणे अखिल भारतीय उपाध्यक्ष , डॉ. मुकेश कसबेकर पश्चिम क्षेत्र संयोजक, डॉ. अविनाश महाजन अधिष्ठाता होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, डॉ. तुषार बेंडाळे सेक्रेटरी IMA,

प्रास्ताविक डॉ. मुकेश कसबेकर –
आरोग्य भारती परिचय मधे आरोग्य भारती चे 24 आयाम मधे कार्य सुरू आहे सांगून दैनिदिन जीवन शैली कसा असावी या बद्दल मार्गदर्शन केले.
प्रवीणजी प्रभाकर –
भारतीय संस्कृती मधे पर्यावरण झाडे यांचे खूप महत्त्व आहे हे सांगताना पिंपळ हे पूजनीय आहे हे विज्ञानाने पण सिध्द केले. पर्यावरण शुध्दीकरण करण्याचे काम पिंपळ चे झाड करत असते. भारतीय संस्कृती मधे चार वेदमधे सुध्धा निसर्ग पर्यावर चां समावेश आहे. कार्यक्रमात आरोग्य भारती देवगिरी प्रांताची स्मरणिका या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवर यांचे हस्ते केले.
श्री. उज्वलजी निकम –
आरोग्य भारती देश स्वस्थ रहावा यासाठी निस्वर्थ काम करीत आहे हे मी बघतोय..पर्यावरण म्हंजे फक्तं झाडे लावणे नसुन त्याचा समतोल सांभाळणे गरजेचे आहे आपण पर्यावरणाच्या वकील म्हणून काम करा..
कार्यशाळेत इनोव्हेटिव्ह project ठेवले होते प्रदर्षनी मधे सहभागी खालील शाळांचे , महाविद्यालयाचे स्टॉल
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सागर मित्र फाउंडेशन, गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज, शासकीय होमिओपॅथी कॉलेज रुग्णालय, क्विल्ड सनशाइन, गांधी रिसर्च फाउंडेशन, पद्मावती नथमलजी लुंकड कन्या शाळा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, नंदिनी बाई वामनराव गर्ल्स हायस्कूल,
यामधून प्रथम ,द्वितीय व तृतीय पारितोषिक तसेच पर्यावरण यावर निस्वार्थ काम करणारे डॉ. राजेश दाभी , विशाल सोनकुल , पवन जाधव , महानगर पालिकेचे सफाई कर्मचारी यांचे सत्कार हे डॉ. हेमंत पाटील बालरोग तज् व श्री. प्रफुल्ल मुंदडा यांचे हस्ते वितरण करण्यात आले.
या कार्यशाळेत संपूर्ण प्रांतातून जवळपास 100 पर्यावरण प्रेमी हजर आहेत. कार्यक्रमात नूतन कार्य कऱ्यकरणी जाहीर करण्यात आली. जळगाव आरोग्य भारतीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील सूर्यवंशी हे असणार आहेत.
कार्यशाळा यशस्वी ते साठी देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ. प्रकाश शिगेदार, डॉ. रवी पाठवतकर प्रांत उपाध्यक्ष , डॉ. लीना पाटील प्रांत उपाध्यक्ष, विशाल बेंद्रे सचिव, श्री अप्पा कुलकर्णी, डॉ. पुष्कर महाजन, कुणाल महाजन, डॉ. शरयू विसपुते , रेवती यज्ञिक , विशाखा गर्गे, पल्लवी उपासनी, निषता लोटवाला, भुषण क्षत्रिय, डॉ. वैभव पाटील हे उपस्थित होते.