⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | Weather Update : आठवडाभर तापमानाचा उच्चांक, वाचा आज कसे असेल तापमान

Weather Update : आठवडाभर तापमानाचा उच्चांक, वाचा आज कसे असेल तापमान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । जळगावमध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला दिसून येतोय. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी तापमान ४६ अंशाच्या उच्चांकी पातळीवर हाेते. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवत असल्याने वाढत्या उष्णतेमुळे जळगावकर हैराण झाले आहेत.

उष्णतेची लाट असलेल्या विदर्भापेक्षाही जळगावातील तापमान रविवारी राज्यात सर्वाधिक हाेते. वाऱ्याचा वेग ताशी १६ ते २० किलाेमीटरपर्यंत हाेता. दुपारच्या वेळी तापमान उच्चांकी पातळीवर असताना वाऱ्याच्या वेगामुळे उष्णतेच्या झळा असह्य झाल्या हाेत्या. विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव जळगाव जिल्ह्यावर प्रामुख्याने जाणवला.

दहा दिवसांपासून राज्यावर घाेंगावत असलेल्या पावसाचे सावट अजूनही कायम आहे. ढगाळ स्थितीत तापमानाचा चटका अधिक तिव्रतेने जाणवत आहे. रविवारी तापमान २ अंशाने वाढून ४६ अंशांवर गेले हाेते. यापूर्वी शनिवारी देखील जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. काही दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशावर आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा तापमान वाढू लागले.

काल रविवारी जळगाव शहरातील तापमान ४६ अंशावर होते. तर भुसावळ ४६, अमळनेर ४६, भडगाव, ४५, चाळीसगाव ४१, एरंडोल ४५, बोदवड ४४, चोपडा ४६, धरणगाव ४६, फैजपूर ४६, जामनेर ४६, पारोळा ४५, रावेर ४६, वरणगाव ४६, मुक्ताईनगर ४६, पाचोरा ४६, सावदा ४५ आणि यावल ४६ अंश तापमानाची नोंद करण्यात आलीय.

दरम्यान, दरम्यान, २५ ते २८ एप्रिलपर्यंत कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार आहे. 29 एप्रिल पर्यंत तापमान 44℃ ते 46℃ दरम्यान राहण्याची शक्यता आहे. २८ एप्रिलपर्यंत विदर्भ वगळता राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

मागील आठवड्यात गुरुवारी तापमानाचा पारा ४० अंशावर आला होता. शुक्रवारी ४२ अंशावर होता. शनिवारी सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर काल देखील ४६ अंश तापमानाची नोंद झाली.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१० वाजेला – ३४ अंश
११ वाजेला – ३७ अंश
१२ वाजेला – ४१ अंश
१ वाजेला- ४१ अंशापुढे
२ वाजेला – ४२ अंशापुढे
३ वाजेला – ४३ अंशापुढे
४ वाजेला – ४४ अंश
५ वाजेला – ४३ अंश
६ वाजेला – ४२ अंश
७ वाजेला – ३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३७ अंशावर स्थिरावणार.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.