जळगाव लाईव्ह न्युज | १५ एप्रिल २०२२ | राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे अवकाळीच्या ढगांनी गर्दी केली असून यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा स्थिर आहे. काल गुरुवारी जळगाव जिल्ह्यात तापमान ४२.२ अंशांवर स्थिरहोता. तर आज शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.
यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरी पासूनच उन्हाचा पारा ४० अंशावर गेला होता. तर चालू महिन्यात राज्यातील काही ठिकाणी तो ४३ अंशावर गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी देखील उन्हाचा पारा ४३ अंशावर गेला होता. सध्या अवकाळीच्या ढगांनी गर्दी केल्याने गुरुवारी आकाश ६६ टक्के ढगाच्छादित हाेते. गुरुवारी पारा ४२.२ अंशांवर स्थिरावले. वाऱ्याचा वेग ताशी १७ किमीपर्यंत असल्याने उष्णतेच्या झळांची तीव्रता वाढलेली आहे.
आज शुक्रवारपर्यंत जिल्ह्यासह राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असेल. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस हाेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने काेठेही हजेरी लावलेली नाही; परंतु आठवड्यापासून वातावरण ढगाळ आहे.
आजचे तापमान असे
काल गुरुवारपेक्षा आज शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पारा २ अंशांने खाली आला आहे. आज ११ वाजेला पारा ३७ अंशावर आहे. तो १२ नंतर ३९ अंशावर राहील.
दुपारी १ वाजेला – ४० अंश
दुपारी २ वाजेला – ४१ अंश
दुपारी ३ वाजेला – ४१ अंश
सायंकाळी ४ वाजेला – ४१ अंश
सायंकाळी ५ वाजेला – ४० अंश
सायंकाळी ६ वाजेला – ३८ अंश
तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत कमी होऊन ३५ वर स्थिरावणार, व रात्री ८ नंतर ३४ वर जाणार.