---Advertisement---
पाचोरा

गुलाबराव पाटलांचे मुखवटे घालून शेकडो समर्थक पाचोर्‍याकडे रवाना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२३ । जळगावातील राजकारण सध्या चांगलेच तापलं आहे. त्याच कारण म्हणजेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पाचोऱ्यात जाहीर सभा होत आहे. यानिमित्ताने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत गेल्या दोन दिवसापासून जळगावात आले आहे. यादरम्यान, संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर गुलाबो गॅंग म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. तसेच गुलाबराव पाटलांना आव्हान करत पाचोऱ्याच्या सभेत घुसून दाखवण्याचा इशारा दिला होता.

pachora jpg webp webp

मात्र, यावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आपले सहकारी पाचोरा येथील सभेत शिरणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यानुसार आज शिंदे गटाचे पदाधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले आहे. त्यामुळे पाचोऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्तहि लावण्यात आला आहे.

---Advertisement---

मंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला जिल्हाप्रमुख सरीता माळी-कोल्हे यांनी आपण गुलाबभाऊंचे मुखवटे घालून पाचोरा येथील सभेत शिरणार असल्याची घोषणा केली. यानुसार गुलाबभाऊंचे शेकडो समर्थक हे पाचोर्‍याकडे रवाना झाले आहेत. आता ते सभेत शिरण्याचा प्रयत्न करणार असल्याने तेथे संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---