---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

गल्लोगल्ली दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची शस्त्र खरेदी ऑनलाईन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खून, हाणामाऱ्या, खुन्नसबाजीचे प्रकार वाढले असून त्यातून गॅंगवार होत आहे. जळगावात गल्लोगल्ली दादा, भाई तयार झाले असून जो ना तो कमरेला चाकू, सुरे घेऊन फिरताना दिसून येतो. हातात एखादे शस्त्र घेऊन दहशत माजविणाऱ्यांच्या गुन्हेगारीला बळ देण्यास ऑनलाईन प्लॅटफॉर्म कारणीभूत आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉनसह अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शस्रे चक्क डिस्काउंटवर मिळत असून ते देखील घरपोच येत असल्याने गुन्हेगारांना पाठबळ मिळत आहे. काही तरुण तर हौस म्हणून किंव्हा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी देखील ऑनलाईन शस्त्रे मागवीत आहेत.

weapons of terror criminals buy online jpg webp

जिल्हा पोलीस प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेत गावठी कट्टा आणि इतर हत्यार मोठ्याप्रमाणावर शस्त्रे मिळून येत आहे. बाजारात खुलेआम शस्त्रांची विक्री होत नसली तरी शस्त्रे ऑनलाईन सहजरित्या उपलब्ध होत आहेत. फोटोशूट, हौस म्हणून विद्यार्थी तरूण शस्त्रे खरेदी करीत असून पोलिसांच्या जाळ्यात सहजरित्या अडकत आहेत. काही सराईत गुन्हेगारांनी तर ऑनलाईन शस्त्रे मागवून चढ्या दराने विक्रीचा धंदाच शहरात सुरू केला आहे.

---Advertisement---

जिल्ह्यात मोहीमेत सापडताय गावठी कट्टे, शस्त्रे
पोलीस प्रशासनाने पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या आदेशानुसार नाशिक परिक्षेत्रात धडक मोहीम सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम हाती घेण्यात आली आहे. एलसीबीसह इतर सर्व पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील आपल्या हद्दीत कारवाईत मोठ्याप्रमाणावर पिस्तुल, चाकू, कोयते, तलवारी, कुऱ्हाड हस्तगत केले. पोलिसांनी अनेकांची धरपकड देखील केली.

ऑनलाईन शॉपींग पोर्टलवर डिस्काउंटसह सहज उपलब्ध
अनेक नामांकित शॉपींग पोर्टल, वेबसाईटवर शस्त्रे सहजरित्या उपलब्ध आहे. स्नॅपडील, अमेझॉन, फ्लीपकार्टसह इतर काही वेबसाईटवर शस्त्रांची मोठी मालिकाच छायाचित्रांसह उपलब्ध आहे. ऑनलाईन वेबसाईट शॉपींग पोर्टलवर नेहमी काही ना काही ऑफर उपलब्ध असतात. त्यात शस्त्रांवर देखील ऑफर उपलब्ध आहे. १० टक्क्यांपासून ७० टक्क्यांपर्यंत सूट असल्याने खरेदीसाठी तरुणाई सहज आकर्षित होत असते. घरबसल्या किंवा एखादा खोटा पत्ता देत मोबाईलवर संपर्क साधून शस्त्रे मिळत असल्याने गुन्हेगारांचे फावले होत आहे.

गल्लोगल्ली तयार होताय दादा, भाई, गुंड
जळगाव जिल्ह्यात सध्या अनेक गुन्हेगारी घटना समोर येत असून त्यात चाकू, सुरा, कोयता सहज वापरला जात आहे. गल्लोगल्ली गॅंग तयार होत असून त्यात अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक दिसून येतो. गुन्हेगारी जगातला गवसणी घालणाऱ्या या तरुणाईला गुन्हेगार होण्यास प्रवृत्त करण्यात ऑनलाईन खरेदी-विक्री साईट्स अधिक कारणीभूत आहेत. पोलीस प्रशासन स्थानिक विक्रेते शोधतात आणि गुंडगिरी करणारे ऑनलाईन शस्त्र मागवितात. ऑनलाईनच्या या घातक बाजाराला जोपर्यंत आळा घातला जाणार नाही तोपर्यंत गुन्हेगारीला आळा घालणे शक्य नाही.

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---