---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

शिंदेंसोबत जाऊन आम्ही फसलो ; शिवसैनिक पुन्हा आले ठाकरेंसोबत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत ठाकरे यांच्या पासून तुटलेले पदाधिकारी पुन्हा ठाकरेंसोबत आले आहेत. ते हि एक दोन नव्हे तर तब्बल १५० शिवसैनिक पुन्हा ठाकरेंसोबत आले आहेत.

uddhav thkare and eknath shinde jpg webp

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठा संघर्ष सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले. या दरम्यान अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आम्ही फसलो आमची फसगत झाली म्हणून तांबाटी येथील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी अविनाश आमले यांनी आपल्या १५० हून अधिक सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय घेतला.

---Advertisement---

अविनाश आमले यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, सहसंपर्कप्रमुख भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या प्रवेशा प्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळबे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निखिल पाटील, सचिव प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, सहसंपर्कप्रमुख अविनाश भासे, अशोक बामणे, रंजना राणे, तानाजी सावंत, तुषार मुंढे आदींसह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---