---Advertisement---
बातम्या

आम्ही बाळासाहेबांचे तर उद्धव ठाकरे शरद पवारांचे अनुयायी – मंत्री गुलाबराव पाटील

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । गेले 35 वर्ष मी शिवसेनेसाठी कष्ट केले. शिवसेना वाढवण्यासाठी काम केलं. आम्ही बाळासाहेबांचे विचार बघून शिवसेनेत आलो. मात्र बाळासाहेबांचे विचार सोडून उद्धव ठाकरे शरद पवारांचे अनुयायी झाले अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

gualbrao patil 1 jpg webp

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या वेळेस शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल त्यात लिहिलं असेल की बाळासाहेबांचे विचार जगण्यासाठी 40 आमदारांनी उठाव केला. मात्र, शरद पवार यांचे अनुयायी होऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. यामुळे आम्ही बाळासाहेबांचे तर तुम्ही शरद पवारांचे अनुयायी आहात. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

---Advertisement---

मी हिंदू धर्माला मानतो. आमच्या हिंदू धर्मात असं म्हणतात की, माणूस मरतो पण आत्मा मरत नाही. सभा शिवतीर्थावरही सुरू आहे. मात्र बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा आत्मा बीकेसी मध्ये आहे. असे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदें LIVE :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/460407346063701/

संपूर्ण राज्य एकनाथ शिंदे यांच्यावर खुश आहे. शेतकरी, कामगार सगळेच एकनाथ शिंदे यांच्यावर खुश आहेत. आमदार खुश आहेत. यामुळे खरी शिवसेना आपलीच आहे. ज्या दिवशी आपल्याला चिन्ह मिळेल, त्या दिवशी समोर ‘टांगा पलटी घोडा फरार’ होईल असेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---