---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

आम्ही आमच्यात भांडतोय ..ते बसून मजा बघत आहेत – रोहित पवार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । नाशिकमध्ये पोस्टर्सवर अजित पवार यांचा फोटो नव्हता. छगन भुजबळांनी सगळं खापर अजित पवार यांच्यावर फोडले. चार ते पाच लोक अजित पवार यांना व्हिलन ठरवत आहेत. लोकांना अजित पवारांचा निर्णय पटलेला नाही. भाजप एसी खोलीत बसून या सगळ्याची मजा बघत आहे. आम्ही आमच्यात भांडतोय असे आमदार रोहित पवार म्हणाले.

ajit pawar rohit pawar and sharad pawar jpg webp webp

पत्रकारांशी बोलतांना रोहित पवार यांनी आज एक किस्सा सांगीतला आहे. ते म्हणाले की, आम्ही वयस्कर होऊ, ऐंशीच्या पुढे जाऊ तेव्हा तू सुद्धा अशीच भूमिका घेशील का, असा प्रश्न मला माझ्या आई वडीलांनी विचारला असे ते म्हणाले. याच बरोबर सामान्य कुटुंबातील आई-वडिलांना आणी तमाम जनेतला हाच प्रश्न पडला आहे असे ते म्हणाले.

---Advertisement---

यावेळी रोहीत पवार यांनी दिलीप वळसे पाटील य़ांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय अनुभव ४० वर्षांचा आहे.माझं वय ३७ आहे. ४० वर्षे पवारांसोबत राहून तरी सुद्धा पवारांची भूमिका दिलीप वळसे पाटील य़ांना कळाली नसेल तर माझी चुक काय?

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---