⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

अडावद ग्रामपंचायतीत पाणीटंचाई : ग्रामस्थ संतप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

‎ जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । अडावद येथे पाणीटंचाई व अस्वच्छ पाणी पुरवठ्याबाबत‎ वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे‎ ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला. सरपंच व ग्रामसेवक‎ नसल्यामुळे संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले.‎

प्रभाग दोनमधील पाणीटंचाई तातडीने दूर करा, अशी‎ मागणी सातत्याने केली जात असली तरी देखील सरपंच,‎ ग्रामसेवक दुर्लक्ष करत आहेत. तर प्रभाग दोनमध्ये पाणीपुरवठा‎ अभावी महिलांची परवड सुरू आहे. परंतु, दुरुस्तीसाठी‎ मनुष्यबळ नसल्याची कारणे सांगितली जातात. सरपंचांकडे‎ वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही. या समस्या तातडीने‎ सोडवाव्यात, अशी मागणी डॉ. अरूण कोठारी, सुनील‎ सारस्वत, वसंत वाणी, शंकर नेवे, नामदेव गेही, पंकज शिंपी,‎ डिंगबर जोशी, उमेश नेवे, किरण खैरनार, भारती शिंपी, शोभा‎ गुरव, शरद सोनार, राजेश कासार, डॉ. व्हि. व्ही. बाहेती, डॉ.‎ प्रफुल्ल देशमुख, भालचंद्र नेवे, लखिचंद पाटील, प्रभाकर‎ कासार आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.‎