---Advertisement---
आरोग्य जळगाव जिल्हा विशेष शैक्षणिक

MBBS करायचयं आहे मग जळगावला या, कारण…

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १ मार्च २०२३ : जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (जीएमसी) इमारत बांधकामासाठी ७११ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांच्या सुधारित खर्चास सोमवारी (ता. २७) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जीएमसीमध्ये आतापर्यंत १०० विद्यार्थ्यांना MBBS ला प्रवेश दिला जात होता. मात्र यापुढे १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ही जळगावसाठी भुषणावह बाब आहे. जळगावमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढल्याने आता देशभरातून येणार्‍या विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील.

doctro jpg webp

जळगाव मध्ये मोहाडी शिवारात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय २०१८-१९ ला सुरू झाले. पहिल्या वर्षापासून एमबीबीएसला १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात पाचव्या बॅचने प्रवेश घेतला आहे. मात्र नव्या शैक्षणिक वर्षापासून १०० ऐवजी १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

---Advertisement---

पूर्वी ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर होते. आता खाटांची संख्या ६५० करण्यात आली आहे. सोबतच ५० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमताही वाढविण्यात आली आहे.जीएमसी जळगावचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ७११ कोटींची सुधारित मान्यता मिळाली आहे. सोबतच येथे ६५० खाटांचे रुग्णालय व १५० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. लवकरच महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू होणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---