⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | वाणिज्य | उन्हाळ्यात गाडीचे चांगले ऍव्हरेज हवे आहे? मग ‘या’ गोष्टी नक्की करा..

उन्हाळ्यात गाडीचे चांगले ऍव्हरेज हवे आहे? मग ‘या’ गोष्टी नक्की करा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ मार्च २०२३ । उन्हाळा जसजसा वाढतो आहे, तसा वातानुकुलीत अर्थात एसी गाड्यांमधून फिरण्याचे प्रमाण वाढते. पण, कडक उन्हामुळे अनेकदा गाड्यांना आवश्यक तेवढे ऍव्हरेज मिळत नाही. उन्हाळ्यात गाडीच्या इंजिनवर जास्त परिणाम होतो. अशा वेळी गाडीची काळजी घेण्यासोबतच काही टिप्स पाळणे देखील गरजेचे आहे. यामुळे आरामदायी प्रवासासोबतच गाडीची देखील योग्य देखभाल घेतली जाईल आणि तुम्हाला चांगले ऍव्हरेज देखील मिळेल.

टायर्सची काळजी घेणे आवश्यक
उन्हाळ्यात टायर आणि त्यातील हवेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. टायरमध्ये पुरेशी हवा नसेल आणि तरीही तुम्ही गाडी चालवली तर त्याचा ऍव्हरेजवर परिणाम होऊ शकतो. पण गाडीच्या टायरमध्ये पुरेशा प्रमाणात हवा नसेल तर ते गाडीसाठी अडचणीचे ठरू शकते.

इंजिन तेलाची योग्य निवड
उन्हाळ्यात योग्य तापमानाचे इंजिन तेल वापरावे. कारण उन्हामुळे ते प्रसरण पावू शकते. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे इंजिन तेल उपलब्ध आहे. परंतु, त्या जाहिरातींना न फसता वाढते तापमान सहन करण्याची क्षमता असेल असेच इंजिन तेल वापरणे सोयीचे आहे.

कुलंटची काळजी घ्या
कार इंजिन थंड करण्यासाठी कुलंट हा आवश्यक घटक आहे. चांगल्या दर्जाचे शीतलक वापरून उन्हाळ्यात इंजिन लवकर थंड करता येते परंतु निकृष्ट दर्जाचे कुलंट वापरल्यास इंजिनचे तापमान सहज नियंत्रित करता येत नाही. याचा इंजिनवर वाईट परिणाम होतो. तसेच अन्य समस्या वाढण्यासोबतच गाडीचे ऍव्हरेज कमी होण्याची भीती आहे.

गाडीचा वेग नियंत्रणात असणे गरजेचे
उन्हाळ्यात गाडी जास्त गरम न होता तिचा योग्य पद्धतीने वापर करून घ्यायचा असेल तर हे वरचे नियम पाळण्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे गाडीचा वेग नियंत्रणात ठेवणे. अनेकदा गाडी भरधाव सोडल्याने नियंत्रण सुटून अपघात होतात. उन्हाळ्यात हा धोका जास्त संभवतो. म्हणूनच उन्हाळ्यात गाडीच्या वेगाबद्दल जास्त काळजी घ्यायला हवी. तसेच अचानक ब्रेक दाबू नये. असे केल्याने कारला जास्त पॉवर लागते.

गाडीतले अनावश्यक सामान बाहेर काढा
सातत्याने प्रवास करण्याची ज्यांची टेंडन्सी असते, अशा लोकांचं बरंच सामान हे गाडीतच ठेवलेलं असतं. प्रवासात सोयीचे व्हावे, कुठे अडचण येऊ नये यासाठी हे योग्य असले, तरी त्याने गाडीतील सामान उगाच वाढत जाते. यामुळे गाडीतील वजन विनाकारण वाढत राहते, आणि सरासरी कमी होते. जर तुम्हाला चांगले ऍव्हरेज हवे असेल तर ही एक महत्त्वाची टीप आहे, गाडीमधून अनावश्यक सामान काढून टाकाव्यात. यामुळे गाडीचे वजन कमी होईल आणि ऍव्हरेज सुधारेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.