Jalgaon : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

जानेवारी 24, 2026 5:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय,जळगाव यांच्या समन्वयाने मेरा युवा भारत जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व NCC यांच्या सहकार्याने दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीत मेरा युवा भारतचे, एन सी सी व एन एस एस चे स्वयंसेवक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

vote election jpg webp

मतदार जागृती रॅली सकाळी 11.00 वाजता जिल्हा सत्र न्यायालय जळगाव येथून सुरू होऊन बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे समाप्त होणार आहे.या रॅलीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क, लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व तसेच युवक व नागरिकांमध्ये मतदार जनजागृती करण्याचा उद्देश आहे.

Advertisements

जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या मतदार जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करता येईल.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now