Savda News-जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । विद्यानृसिंह भारती, स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजेदरम्यान सावदा येथील चितोडे वाणी समाज (डोखळे) राम मंदिराला भेट दिली. दरम्यान, सर्वत्र राम हे असून प्रत्येकाचे तोंडी राम नाम असणे आवश्यक आहे, कलियुगात राम नाम हे मनुष्यास तारणारे नाम असल्याचे सांगितले.
तसेच देशाचे चलन असलेल्या नोटेवर देखील लवकरच भगवान राम यांचे चित्र दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यानृसिंह भारती, स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांचे यावेळी धार्मिक वातावरणात भक्तिभावे स्वागत करण्यात आले, त्यांचे पाद्यपूजन शैलेश यावलकर व त्यांच्या धर्मपत्नी माया यावलकर यांनी केले.
या प्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक जगदीश बढे, माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे, माजी नगराध्यक्षा हेमांगी चौधरी, अनिल वाणी सर, विशाल वाणी श्रीकांत वाणी चितोडे वाणी समाजाचे अध्यक्ष सतीश खरे, उपाध्यक्ष अरविंद अकोले, सचीव दिपक श्रावगे, अरविंद वाणी, गजानन भार्गव, महेश अकोले,मनोज खरे, श्रीकांत वाणी, नितीन खरे, मंगेश वाणी, सुनील वाणी, यांचे सह असंख्य भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
त्यानंतर महाराज यांनी येथील माजी नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे व शेखर वानखेडे यांचे घरी, श्रीकांत वाणी, यांचे घरी भेट दिली तसेच येथील गचके यांचे दत्त मंदीर व सतीश जोशी महाराज यांचे घरी नाथ महाराज यांचे दर्शन घेतले, ठिकठिकाणी त्यांचे स्वागत देखील करण्यात आले.