कोरोना नियमांचे उल्लंघन : जळगावात १० व्यावसायिकांना मनपाने बजावली नोटीस
जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२१। जळगाव शहरासह जिल्ह्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून लागू करण्यात आलेल्या नियम व अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील सुपरशॉपसह तब्बल १० व्यावसायिकांना गुरुवार दि.२ रोजी महापालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरासह जिल्हयात कोविड-१९ विषाणुचे वेगवेगळ्या स्वरुपातील आढळून येणाऱ्या विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच साथरोग कोरोना प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये जळगाव शहरातील मॉल, दुकाने, हॉटेल यासह इत्तर व्यावसायिकांना सोशल डिस्टसिंगचे पालन, चेहऱ्यावर मास्क, ग्राहक व दुकानातील स्टाप यांचे लसीकरण आदी नियम व अटींच्या अधिन राहुन व्यवसाय करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र काही व्यावसायिकांकडून या नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय केला जात असल्याचे मनपाकडून याकामी नेमण्यात आलेल्या पथकाला आढळून आले. त्यानुसार गुरुवार दि.२ रोजी शहरातील १० व्यावसायिकांना या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी, उपायुक्त शाम गोसावी यांनी शहरातील मनोहर साडीया, नितीन फूट वेअर्स, संत कंवरराम क्लॉथ स्टोअर्स, आकाश एजन्सी, मनोहर शूज सेंटर, राजेश कलेक्शन, बॉम्बे सेल, नवजीवन प्लस, वसंत सुपर शॉप, श्रीजी साडीया आदींना नोटीस बजावून आपल्यावर दंडात्मक कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येवु नये? तसेच दुकान सिल का करण्यात येवु नये? याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे.
???? पहा कारवाईचे व्हिडिओ : ????
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/593936351936832