या भ#$%*@#^… मुख्यमंत्र्यांवर टीका करताना विनायक राऊतांच्या तोंडून निघाली शिवी
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर शिवसेना (Shiv Sena) नेते टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना कोकणातील खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या तोंडून शिवी निघाली.
नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?
विनायक राऊ यांनी जोरदार टीका करत म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं, शिवसेना नाव पुसून टाकायचं, या भ#$%*@#^ करणाऱ्या 40 शिवसेना आमदारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, बिंबवण्याचा या मुख्यमंत्री शिंदेंचा असल्याचे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले कि, पण असं सांगणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावंच लागणार असल्याचे म्हणाले. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात ते शनिवारी बोलत होते.
किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली, असंही विनायक राऊत यांनी यावेळी म्हटलंय. 40 आमदार, 12 खासदार गेले तरीही घाबरू नका, असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना पेटून उठण्यास सांगितलं. बंडखोरांविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यासाठीही सज्ज राहण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.