---Advertisement---
गुन्हे निधन वार्ता महाराष्ट्र राजकारण

शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मृत्यूसमयी खिशाला होता तिरंगा!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्राचा बुलंद आवाज, विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मोठा अपघात झाला. (Vinayak Mete Passed Away) पनवेल येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. ते ५२ वर्षांचे होते.

shiv sangram leader Vinayak mete passed away car accident

विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे स्वतःच्या चारचाकीने जात असताना त्यांचा शनिवारी पहाटे खोपोली येथील बोगद्याजवळ अपघात झाला होता.

---Advertisement---

या अपघातात विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. अपघातात मेटे यांचा मुलगाही जखमी झाला असल्याचं समोर येत आहे. विनायक मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रविण दरेकर हे एमजीएमच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दरम्यान, अपघातानंतर मृत्यूपूर्वीचे विनायक मेटे यांचे अखेरचे फोटो समोर आले आहे. यामध्ये विनायक मेटे यांचा चेहरा रक्तबंबाळ झालेला दिसून आलाय. त्यांना एका स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं होतं. त्यांना शुद्ध नव्हती. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्याच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता. हनुवटीला आणि चेहऱ्याच्या खालच्या बाजूला मोठं रक्त लागल्याचंही दिसून आलं होतं. तसंच शर्टावरही रक्ताचे डाग लागल्याचं दिसून आले आहे. विनायक मेटे यांच्या निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी मोठा लढा दिला होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---