जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । संघर्ष असले की, कोणतीही गोष्ट मिळवणे शक्य होते. चाळीसगाव शहरातील विक्रांत मोरकर याने नियमितपणे अभ्यास व मैदानी चाचणीची तयारी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
त्याने पदवीचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये पूर्ण केले असून पुण्यात राहून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. शारिरीक चाचणीचा सराव औरंगाबाद येथे भरत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली केला. तो जेता सायन्स अकॅडमीचे संचालक दीपकसिंग शंकरसिंग मोरकर व राष्ट्रीय कन्या शाळेच्या शिक्षिका शोभना दीपकसिंग मोरकर यांचा चिरंजीव तर जेता सायन्स अकॅडमीचे संस्थापक श्रीकांत दीपकसिंग मोरकर यांचे लहान बंधू आहे. या यशाबद्दल त्याचे चाळीसगाव तालुक्यात सर्वत्र कौतुक हाेत आहे.