---Advertisement---
जळगाव शहर निधन वार्ता

माजी महापौर ललित कोल्हे यांना पितृशोक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहराचे माजी नगरसेवक विजयराव (बापूसाहेब) कोल्हे वय – ७० यांचे गुरुवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते माजी महापौर ललित कोल्हे यांचे वडील तर शिवसेना महिला जिल्हाअध्यक्षा सरिता माळी कोल्हे यांचे सासरे होते. त्यांची अंतयात्रा उद्या दुपारी १ वाजता राहत्या घरून निघेल.

vijayrao kolhe jpg webp

स्वातंत्र्यसैनिक पंडितराव कोल्हे यांचे चिरंजीव असणार्‍या विजयबापूंनी त्यांचा समाजसेवेचा वारसा समर्थपणे चालविला. ऐशीच्या दशकात तत्कालीन जळगाव नगरपालिकेपासून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणार्‍या विजयबापूंनी सातत्याने जवळपास ३५ ते ४० वर्षे नगरसेवकपद भूषविले. त्यांच्या सौभाग्यवती सिंधूताई कोल्हे यांना नगराध्यक्षपद तर चिरंजीव ललीतभाऊ यांना महापौरपदाची संधी देखील मिळाली. विजय बापू यांच्या निधनामुळे समाजातील सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---