⁠ 
शनिवार, मे 4, 2024

हरियाणाच्या मेवात येथील हिंदूंच्या मंदिरावरील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विहीपचे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। आपला भारत देश हा संस्कृतीचे प्रतीक असून यातील हरियाणा हे एक ऐतिहासिक राज्य आहे. तेथील मेवाड मध्ये पाच प्राचीन महादेव मंदिर आहेत. तिथे अधिक मास श्रावण निमित्त लाखो भाविक यात्रेसाठी येत असतात. दि. १ ऑगस्ट रोजी तेथील जिहादी आतंकवादी मानसिकतेच्या लोकांनी अंधाधुंद गोळीबार केला. पेट्रोल बॉम्ब, बसेस तेथील गाड्या दुकाने घरे याची जाळपोळ केली. या प्रकारामध्ये तेथील भक्तांना गंभीर जखमा झाल्या.

तसेच यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे दोन निष्पाप कार्यकर्त्यांचे बळी गेलेत. या क्रूर दहशतवादी मानसिकतेचे प्रवृत्ती असलेले मेवाड येथील विकृती यांना चारी बाजूने मेवाड बंदोबस्त कवच आखून यांना लवकरात लवकर शोधावे व यांच्यावर देशद्रोह आतंकवादी तसेच कठोरातून कठोर खटले चालवावे.

तसेच या प्रकारात जे निष्पाप विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्ते यांनी आपले प्राण गमावले. यांच्या कुटुंबीयांना शासकीय प्रत्येकी एक करोड रुपयाची मदत तसेच तेथील गंभीर जखमी असलेल्यांना वीस लाखाची मदत त्वरित मिळावी, अशी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे महामहीम राष्ट्रपती यांना मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे मार्फत मागणी करण्यात येत आहे.

निवेदन सादर करताना विहिप चे जिल्हामत्री देवेंद्र भावसार, श्री. डी एन तिवारी, महानगर मंत्री मनोज बाविस्कर, समाधान पाटील जिल्हा सहसंयोजक, देश कोल्हे धर्मप्रसार प्रमुख, वन झुंजारराव महानगर सह संयोजक, भरत कोळी , व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते