जळगाव जिल्हाजळगाव शहरराजकारण

न्यायालयात मिळाला विद्या गायकवाड यांना ‘न्याय’ ; आयुक्तपदी नियुक्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२३ । जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. ,मॅट कोर्टाने हा आदेश दिला आहे. यामळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला असल्याचे म्हटले जात आहे. (Dr Vidya Gaikwad is going to be Jalgaon Municipal Commissioner)

जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश २९ नोव्हेंबर २०२२ रोजी आले होते. यावेळी आलेल्या आदेशाने सगळ्यांनाच धक्का बसला होता.डॉ. विद्या गायकवाड यांची जळगाव महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होऊन केवळ सहा महिने झाले होते. तसेच, बदलीचे कोणतेही कारण नसताना ही अचानक बदली का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करून त्यानी ‘मॅट’मध्ये अर्ज दाखल केला होता.

तर दुसरीकडे परभणी येथील आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती मनपा आयुक्त म्हणून केली होती. पवार यांनी शासकीय आदेशानुसार त्यांनी तत्काळ जळगाव येथे येऊन पदभार स्वीकारला, त्याचवेळी डॉ. गायकवाड या पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. हा एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप डॉ. विद्या गायकवाड यांनी केला होता.

‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. मात्र, निकाल लागेपर्यंत देविदास पवार हेच आयुक्तपदी राहतील, असे आदेश दिले होते. ‘मॅट’मध्ये तब्बल दोन महिने याची सुनावणी चालली. अखेर आज (ता. ३१ जानेवारी) निकाल लागला असून डॉ. गायकवाड यांना दिलासा मिळाला आहे. त्यांची जळगाव महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करावी, असे आदेश ‘मॅट’ने सरकारला दिला आहे.

Related Articles

Back to top button