Video Viral : चित्रा वाघ यांनी डिवचले, काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं?
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपल्या ट्विट द्वारे विचारला. चित्रा वाघ यांनी नाना पटोले यांचा एक व्हायरल होणारा व्हिडियो शेअर केला.यामुळे सध्या महाराष्ट्रात पटोले विरुद्ध वाघ असे युद्ध सुरु झाले आहे. (nana patole vs chitra wagh)
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच एक व्हिडियो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. . मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यामुळे नाना पटोले संपूर्ण राज्यात ट्रॉल होत आहेत.हाच विडीयो चित्रा वाघ यांनी व्हायरल केला.
यावर बोलताना आमदार नाना पटोले म्हणाले कि, काम करणाऱ्याला बदनाम करणे, ही भाजपाची रणनीती आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. चित्रा वाघ यांच्याविषयी मी काहीही बोलणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले. द