---Advertisement---
महाराष्ट्र

महाराष्ट्र आणि विदर्भ एक्स्प्रेस दहा दिवस नागपूरपर्यंतच धावणार, ‘हे’ आहेत कारण?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । भुसावळहुन गोंदियाकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेस आजपासून म्हणजेच ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूरपर्यंतच धावणार आहे. त्यामागील कारण म्हणजे नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने या दोन्ही गाड्या नागपूरपर्यंत धावणार आहे.

train 3 jpg webp

दरम्यान, या ब्लॉकमुळे २ ते १४ डिसेंबर या कालावधीत काही गाड्या रद्द, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ५ ते १३ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरपर्यंतच धावणार आहे. १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ६ ते १४ डिसेंबरपर्यंत गोंदिया ऐवजी नागपुरातून सुटणार आहे.

---Advertisement---

११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ४ ते १२ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरपर्यंतच धावणार असून, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ६ ते १४ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरहून प्रवासाला प्रारंभ करेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---