पालकांनो खबरदार! तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांना वाहन देताय? आधी ही बातमी वाचाच

ऑगस्ट 29, 2023 2:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात वाहन चालविण्यासाठी परवाना वयाच्या १८ वर्षानंतर मिळतो. तरीही काही पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देत असतात. पण अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणाऱ्या पालकांना महागात पडणार आहे. अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास पालकांना दंड केला जात आहे.

vehicle jpg webp

जळगाव जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत २४ जणांना एक लाख २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले वाहन चालविताना पकडले गेल्यास त्यांच्या आई-वडिलांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो व कारावासही होऊ शकतो.

शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये तसेच विविध क्लासेसमध्ये जाणारे अनेक अल्पवयीन मुले-मुली शहरात भरधाव वेगाने वाहने चालविताना दिसतात. १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही ते वाहन चालवितात. संबंधितांमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा वाहनधारकांविरोधात कारवाई केली जाते.

अल्पवयीन मुलगा-मुलगी आई- वडिलांचे वाहन चालवताना पकडले गेले तर त्या अल्पवयीनपेक्षा मोठी कारवाई पालकांवर होऊ शकते. या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी पालकही रोखत नाहीतर काही ठिकाणी त्यांना प्रोत्साहन दिलं जाते. तुमच्या ही कृती चांगलीच महागात पडू शकते.

अल्पवयीन मुले वारंवार वाहन चालवीत हा गुन्हा वारंवार केल्यास मोटार वाहन अधिनियमांतर्गत आई-वडिलांना ३ वर्षांपर्यंत कारावासही होऊ शकतो. अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या आई-वडिलांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड केला जातो. कारवाईचे हे पाऊल अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यापासून रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now