जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । पाचोरा तालुक्यातील वरखेडी ग्रामपंचायतीतर्फे गावातील ग्रामस्थ सुरक्षित राहावे म्हणून शासन आदेशानुसार सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहे.यात गावातील सर्व व्यावसायिक बंधूंनी ग्रामपंचायतीला सकारात्मक साथ देत आपले व्यवसाय तथा प्रतिष्ठान शंभर टक्के बंद ठेवून ग्रामपंचायती सह या युद्धात आपले योगदान देत आहेआहेत.
ग्रामस्थांच्या व व्यावसायिकांच्या या योगदानामुळेच ग्रामपंचायतीने मागील महिन्यात दोन वेळा व्यावसायिक तथा ग्रामस्थांची प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडी च्या सहकार्याने कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले होते यात अपवाद म्हणून नगण्य बाधीत निघाले.त्यांना लागलीच योग्य उपचार व सूचना देण्यात येऊन घरीच होम क्वाॅरंटाईन होण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
तसेच वरखेडी ग्रामपंचायतीतर्फे जवळजवळ तीन वेळेस प्रत्येक गल्लीबोळात प्रत्येक घरासमोर तथा दुकानांसमोर सोडियम हैपो क्लोराईड फवारणी करून कोरोना चा विषाणू नामशेष करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.आणि यामुळे खरोखर आज मितीस वरखेडी गावी कोरोना ला गावाच्या वेशीवर थोपवल्याची स्थिती आहे.ग्रामस्थांना ग्रामपंचायती तर्फे वारंवार यासंदर्भात काळजी घेण्यासाठी जनजागृती केली जात आहे. सर्वांनी मास्क,सॅनेटायझर साबणाने हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर ठेवणे,गर्दी न करणे असे सांगीतले जात आहे.वास्तविक जवळपासच्या गावांमध्ये कोरोना चे रुग्ण वाढत असताना वरखेडी गावी मात्र अजून तरी परिस्थिती स्थिर आहे.
यात गावातील लहान-थोर तथा सुज्ञ,ग्रामस्थ,व्यवसायिक यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.आणि त्यांच्या काटेकोर नियमांचे पालन यामुळेच हे शक्य होत आहे. असेच सहकार्य कायम असू द्यावे व आपल्या सह आपल्या गावासह आपल्या कुटुंबाची देखील अशाच प्रकारे काळजी घ्यावी व सुरक्षित रहावे.असे आवाहन ग्रामपंचायत तर्फे करण्यात येत आहे.