जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२५ । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात हनुमान जन्मोत्सवानिमीत्त अभिषेक पूजन, हनुमान चालीसा पठण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

प्रशासकीय अधिकारी आशिष भिरूड यांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक प्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील,डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड,गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके,गोदावरी अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रविण फालक, यांचेसह विविध महाविद्यायलाचे प्राचार्य सह गोदावरी फाउंडेशनचे राजपूरोहीत डी टी राव यांचेसह मान्यवर उपस्थीत होते.
केतकी मेडीकोजची दुसरी शाखेचे उदघाटन
हनुमान जन्मोत्सव आणि माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांचे चिरंजिव प्रसिध्द मेंदूविकार तज्ञ डॉ. अनिकेत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोदावरी फॉउंडेशन संचलित केतकी मेडीकोजच्या दुस—या शाखेचे उदघाटन नारळ वाढवून करण्यात आले.
आकाशवाणी चौकातील गोदावरी फॉउंडेशन संचलित महादेव हॉस्पीटल येथे आज केतकी मेडीकोजच्या दुस—या शाखेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी रामभक्त हनूमान जन्मोत्सवानिमीत्त पूजन करण्यात आले. केतकी मेडीकोजचे प्रमुख निलेश पाटील यांनी नारळ वाढवून शाखेचे औपाचारिक उदघाटन केले. यावेळी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थीत होता.