⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मोठी बातमी ! लाचेची मागणी करणाऱ्या वरणगावच्या वायरमनला अटक

मोठी बातमी ! लाचेची मागणी करणाऱ्या वरणगावच्या वायरमनला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२४ । नविन वीज मीटर बसवण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वरणगावचा वायरमनला अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव पथकाने अटक केली. अमीन शहा करामत शहा वय 33, व्यवसाय ( नोकरी वायरमन) असे या वायरमनचे नाव असून याप्रकरणी वरणगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

याबाबत असे की, यातील तक्रारदार यांचे घराला नविन वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच MSEB वरणगांव कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता व डिमांड नोट भरली होती. त्यानंतर डिमांड नोटची झेरॉक्स प्रत सही शिकका मारून त्याची ओसी घेतली. त्यानंतर तक्रारदार यांनी वायरमन अमीन शहा करामत शहा यांना मीटर बसविणे बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की तुमचे वीज मीटर बसवून देण्यासाठी मला 2000/ रुपये द्यावे लागेल अशी लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता वायरमन यांनी तडजोडी अंती 1000/रुपयांची मागणी केली.

अमीन शहा करामत शहा हे लाच मागत असताना त्यांना सापळा कारवाईचा संशय आला म्हणून त्यांनी तक्रारदार यांचे गळ्यातील व्हॉइस रेकॉर्डर जबरदस्तीने हिसकावून घेतले. व सरकारी मालमत्तेचे नुकसान केले सदर लाचखोरास ताब्यात घेतले असून त्यांचे विरुध्द वरणगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.