जळगाव शहरातील जैन स्वाध्याय भवन येथे आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । महाराष्ट्र शासन, जळगाव शहर महानगरपालिका, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व सकल जैन श्री संघ जळगावच्या माध्यमातून आजपासून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रतनलाल सी बाफना जैन स्वाध्याय भवन येथे भव्य लसीकरण केंद्रामध्ये दिवसाला एक हजार जणांचे लसीकरण क्षमता आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण्याच्या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन , जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जैन उद्योग समूहाचे अतुल जैन , माजी खासदार ईश्वरलाल जैन, कस्तुरचंद बाफना ,माणकचंद बैद, नगरसेवक नितीन लढ्ढा, रेडक्रॉसचे गनी मेमन, सुभाष साखला , विनोद बियाणी ,मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी आदींनी भेट देली. या मान्यवरांच्या उपस्थित स्वाध्याय भवनात लसीकरणास सुरवात करण्यात आली.
स्वाध्याय भवन लसीकरण केंद्राचे वैशिष्ट्ये
स्वाध्याय भवन लसीकरण केंद्रामध्ये 400 हुन अधिक नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येकाची आॕनलाईन बुकिंग विषयी खात्री करूनच नागरिकांना लसीकरण केंद्रात सोडण्यात येते. सॕनिटायझर, सोशल डिस्टन्ससह कोव्हिड संबधित शासकिय नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात येत होते.
सर्वांना लस मिळणारच – महापौर जयश्री महाजन
लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे काही ठिकाणी लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. मात्र सर्वांनाच लस मिळणार असून नागरिकांनी धीर धरावा असे आवाहन करित जैन इरिगेशनने प्रशासनाचा भार उचलल्याने त्यांचे आभार महापौर जयश्री सुनील महाजन यांनी व्यक्त केले.
सहकार्यातून भव्य लसीकरण – अतुल जैन
शासनाने टाकलेला विश्वास आणि सामाजिक बांधिलकीतुन स्वाध्याय भवन येथे भव्य लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रिबुकिंगधारकांनाच येथे लस दिले जात असुन शासनाने सहकार्य केले तर ही संख्या दिवसाला एक हजार पेक्षा जास्त जणांना कमी वेळेत आणि सुरक्षित लसीकरण करता येईल अशी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी दिली
स्वयंसेवी संस्थांचा चांगला उपक्रम- पालकमंत्री गुलाबराव पाटील
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन , सकल श्री जैन संघ, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांचे मार्गदर्शन व जैन इरिगेशन चे नियोजन यामुळे जिल्हात लसीकरण मोहीमेला गती मिळाल्याचा आनंद आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यामुळे जळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमण रोखण्यास यशस्वी झाल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी श्री सकल जैन संघ संलग्न सेवाभावी संस्था जय आनंद ग्रुप, श्री रत्न युवक परिषद, श्री जैन सोशल ग्रुप, श्री युवाचार्य ग्रुप आदी स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे अनमोल सहकार्य मिळाले, लसीकरण घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीस निर फौंडेशन च्या झाडाचे रोप देण्यात आले