गुरूवार, जून 8, 2023

लोखंडी कुकरी घेऊन दहशत माजविणारा हद्दपार आरोपी गजाआड

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ मे २०२३ | शहरातील गेंदालाल मील परिसरात भीमा कोरेगाव चौकात हातात लोखंडी कुकरी घेवून दहशत पसरविणाऱ्या हद्दपार आरोपीला गुरूवार दि.२५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरातील भीमा कोरेगाव चौकात संशयित आरोपी महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (वय-२१) रा.गेंदालाल मील, जळगाव हा हातात लोखंडी कुकरी घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती पोलीस कर्मचारी रतन गिते यांना मिळाली होती. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना‍ लागलीच त्यानुसार पोलीस शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस कर्मचार पोहेकॉ भास्कर ठाकरे, पो.कॉ.अमोल ठाकूर, चारू पाटील यांनी गुरूवार २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपी महेश उर्फ मन्या लिंगायत याला अटक केली.

पोलिसांनी त्यांच्याकडून लोखंडी कुकरी हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आरोपी महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत यांच्या विरोधात रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भास्कर ठाकरे करीत आहे.