जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२३ । सध्या वाढत्या लाईट बिलामुळे सर्वच त्रस्त आहे. या महागाईच्या युगात वाढत्या वीज बिलाचा झटका नागरिकांना सहन होत नाही. अशात घराचे वीज बिल कमी करण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे विजेच्या बचतीसोबतच तुमचा विजेचा खर्चही कमी होईल. वीज बिल कमी करण्याच्या सोप्या टिप्सबद्दल जाणून घेऊया.

सीएफल बल्ब
सामान्य बल्बऐवजी कमी उर्जेचा बल्ब वापरा. त्यामुळे ऊर्जेचा वापर कमी होईल आणि प्रकाश व्यवस्थाही चांगली होईल. CFL किंवा LED दिवे वापरून तुम्ही सुमारे 70% विजेची बचत करू शकता.
फ्रीजर डीफ्रॉस्ट ठेवा
जर तुमच्या फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाला तर या बर्फामुळे फ्रीजची कूलिंग पॉवर कमी होते आणि त्यामुळे जास्त वीज लागते. म्हणून, फ्रीझर नेहमी डिफ्रॉस्ट करून ठेवा आणि गरम अन्न थोडं थंड झाल्यावरच गोठवा.
या गोष्टी बंद करा
टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल चार्जर इत्यादी इलेक्ट्रिक उपकरणे वापरल्यानंतर त्यांचा पॉवर स्विच नक्कीच बंद करा.
एसी चालवताना खोली बंद ठेवा
जर तुम्ही एसी चालवत असाल तर घराच्या सर्व खिडक्या, दरवाजे, स्कायलाइट्स इत्यादी व्यवस्थित बंद आहेत याची खात्री करून घ्या. एसीच्या ऐवजी सीलिंग फॅन किंवा टेबल फॅन वापरू शकता.
लॅपटॉप बंद करा
संगणकावर काम केल्यानंतर नेहमी पॉवर स्विच बंद करा. जर तुम्ही कॉम्प्युटरवर काम करताना ब्रेक घेत असाल तर मॉनिटर बंद करा. कॉम्प्युटरला जास्त वेळ स्लीप मोडमध्ये ठेवू नका, उलट तो बंद करा.