⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावला अवकाळी पावसाचा फटका, 4 हजार 534.30 हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान

जळगावला अवकाळी पावसाचा फटका, 4 हजार 534.30 हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने विविध तालुक्यातील 4 हजार 534.30 हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार 906 हेक्‍टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

मागील तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा  तालुक्यांना बसला आहे

या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील झाले असून 1 हजार 906 हेक्‍टर वरील पिके नष्ट झाली आहे. त्याखालोखाल चाळीसगाव तालुक्यात 1592.90 हेक्‍टर वर नुकसान झाले. तसेच पाचोरा तालुक्यात 862.20 हेक्‍टर, बोदवड तालुक्यात89.40 हेक्‍टर, मुक्ताईनगर तालुक्यात 46 हेक्‍टर, भडगाव तालुक्यात 37.80 हेक्टरवर असे एकूण चार हजार 534.30 हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. पिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्‍याला बसला असून सहा तालुक्यात 1391.20 हेक्‍टरवरील मका नष्ट झाला आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारीचे आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.