जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ५ वर एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आला. घटनेची माहिती तात्काळ रेल्वे पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, तपासणी केल्यानंतर तरूणाचा दिर्घ आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.