⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

उन्मेष पाटीलांचा भाजपच्या खासदारकीचा राजीनामा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । गेल्या काही दिवसापासून जळगावचे खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेला आज पूर्णविराम मिळालं. उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रवेशापूर्वी उन्मेष पाटील यांनी आपला खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे फॅक्स केला.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना उन्मेष पाटील यांच्या प्रवेशामुळे जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटाकडून जळगावातून लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतची घोषणाही केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.