जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीनामा सत्र सुरूच आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.आर.एल. शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरुंकडे दिला आहे.
विद्यापीठात वर्षभरात या पदावर नेमणूक झालेल्या पाच जणांनी राजीनामा दिला आहे. परीक्षा संचालक पदावरील दोन अधिकाऱ्यांनीही यापूर्वी राजीनामे दिले आहेत. सुरुवातीस डॉ.बी.व्ही. पवार यांच्याकडे प्रभारी प्र. कुलगुरूंचा पदभार आल्याने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रा.ए.बी. चौधरी यांनी महिन्याभरातच राजीनामा दिला. यानंतर यापदावर डॉ. शामकांत भादलीकर यांची नियुक्ती झाली. कर्मचाऱ्यांची माहिती शासनास दिल्यावरून कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारल्याने त्यांनाही राजीनामा द्यावा लागला हाेता. यानंतर पुन्हा प्रा.ए.बी.चौधरी राजीनामा सुपुर्द केला. २० वर्षांपासून स्टॅटीस्टीक्स विभागात काम करीत आहे. प्रभारी कुलसचिव पदावरही जबाबदारी आजही सांभाळत आहे.
मात्र, या नविन पदामुळे मूळ विभागाच्या कामांवर परिणाम होत आहे. यामुळे कुलसचिव पदाचा पदभार काढून मूळ पदावर कायम नियुक्ती द्यावी अशी मागणी एक महिन्यापूर्वी केली होती. आता राजीनामापत्र दिले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..