⁠ 
शुक्रवार, जानेवारी 3, 2025
Home | महाराष्ट्र | या अनोख्या विवाह सोहळ्याची होतेय राज्यभर चर्चा ; कारणही तसंच आहे

या अनोख्या विवाह सोहळ्याची होतेय राज्यभर चर्चा ; कारणही तसंच आहे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२३ । अहमदनगर जिल्ह्यातील एका अनोख्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा होत आहे. कारणही तसंच आहे. स्मशानभूमीमध्ये मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळा थेट स्मशानभूमीत लावत अंधश्रद्धेला फाटा दिला आहे. स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह करत असून इतरांसाठी अशुभ असणारी स्मशानभूमी त्यांच्यासाठी पोटापाण्याचा साधन झाली. याच ठिकाणी राहून आपल्या मुलीच शिक्षण पूर्ण केलं.

मयुरीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्नासाठी वराची निवड करण्यात आली आणि लग्न थेट स्मशानभूमीतच लावण्याचा निर्णय गायकवाड दाम्पत्याने घेतला. सोहळा सुद्धा अगदी थाटामाटात पार पडला. मयुरी व मनोज यांच्या विवाह सोहळ्यासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकण्यात आला. सनई चौघाड्यांचा सुरात आणि शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहत या अनोख्या लग्नात सहभाग घेतला. अंधश्रद्धेला फाटा देणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत करत या नववधूंना शुभेच्छा दिल्या. आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात मनोज आणि मयुरीने थेट स्मशानभूमीत केली असून या विवाह सोहळ्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.