जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपतर्फे शहरात एक आगळा वेगळा उपक्रम व एक आगळी वेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली. गरीब, निराधार, बेवारस अशा मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजून जिवंत असल्याचे चित्र दिसून आले.
या उपक्रमाला महाराजांच्या दर्शनाने सुरुवात करण्यात आली. सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्यातर्फे सकाळी 9 वाजेपासून रेल्वे परीसर, शिवाजी महाराज पुतळा, शासकीय रुग्णालय या परिसरात असणाऱ्या बेवारस निराधार यांना जमा करून त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून त्यांना माणूस बनवण्याचे कार्य सुमीतभाऊ माणुसकी समुहाने केले आहे. हे कार्य राज्यभरात निरंतर सुरु आहे. निराधार व बेवारस फिरणाऱ्या पुन्हा समाजात परतण्याचा हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवला जातो. सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून सुमित पंडित व सहकारी हे कार्य करत आहेत. दरवर्षी शिवजयंतीला गेल्या दहा ते बारा वर्षापासून ही सेवा दिली जात आहे. यंदा जळगाव येथे सेवा देण्यात आली. यामध्ये इतरांनी सहभाग घ्यावा असे आव्हान माणुसकी समुहातर्फे सुमीत पंडीत यांनी केले आहे. बेवारस निराधारांना माणुसकी ग्रुपने मदतीचा हात दिला आहे हे कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे. महाराष्ट्रमध्ये आतापर्यंत हजारो मनोरुग्णांना येरवडा कारागृह पुणे येथे नेउन त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे.
दुनिया मे आकर कमाया हिरे क्या मोती आखीर कफन को जेब नही होती. अशी भावना सुमित पंडित यांनी यावेळी व्यक्त केली तसेच या कार्यात इतरांनीही सहभाग नोंदवावा बेवारस निराधारांना पैसे देणे बंद करावे त्यांचे घर शोधून त्यांना नातेवाईकांकडे सोपवणे गरजेचे आहे. यासोबतच त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणणे खरी मानव सेवा आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थापक सुमित पंडित माणुसकी समुहाचे जिल्हा अध्यक्ष गजानन क्षीरसागर
जळगाव शहर व परिसरातील माणुसकी समूहाचे सदस्य धीरज भदाणे, विनोद सपकाळे, मयूर पाटील, प्रशांत महाजन, अमित खैरनार, कमलाकर माळी, चेतन पाटील, निलेश कोळी हे उपस्थित होते.