⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | Budget 2024 : रोजगार वाढवण्यासाठी 5 योजना जाहीर, अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा? वाचा..

Budget 2024 : रोजगार वाढवण्यासाठी 5 योजना जाहीर, अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा? वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प मांडत असून यावेळी अनेक मोठं मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. यावेळी रोजगार वाढवण्यासाठी 5 योजना जाहीर करण्यात आली असून या योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तसेच मुद्रा कर्ज योजनेच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. नेमक्या कोण-कोणत्या घोषणा केल्यात पहा

अर्थसंकल्प या घोषणा..

  • भारतात चलनवाढीचा दर 4% लक्ष्यापर्यंत कमी झाला
  • महिलांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे, असं सांगतानाच महिलांच्या विकासासाठी 3 लाख कोटीची तरतूद करण्यात येणार आहे.
  • “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • बजेटमध्ये रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस असेल, असं निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. उत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी, सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांना प्राधान्य असेल असं सीतारमण म्हणाल्या.
  • देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख कर्जावर सरकारकडून मदत देण्यात येईल.
  • आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटीचा निधी देणार
    – चेन्नई ते विशाखापट्टम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणार
    – बिहारमध्ये रस्ते बांधणासाठी 26 हजार कोटी देणार. त्याशिवाय बिहारमध्ये मेडीकल कॉलेज होणार.
  • मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे
  • पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधण्यात येणार
    – पीएम आदिवासी उन्नत गाव मोहिमेअंतर्गत सरकार आदिवासी भागांचा विकास करेल. याअंतर्गत 63000 गावांचा विकास करण्यात येणार आहे.
    प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-4 ची घोषणा.
  • पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींचा निधी देण्यात येणार.
  • 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार.
  • कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतुदी
  • खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार
    100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना
  • 500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार
  • नवीन इंटर्नशिप योजना जाहीर, या योजनेनुसार 5 वर्षांत 1 कोटी तरुणांना 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळेल. या कालावधीत तुम्हाला दरमहा 5000 रुपये मिळतील
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.