⁠ 
रविवार, मे 5, 2024

पदवीधरांसाठी खुशखबर! युनियन बँकेत निघाली मेगाभरती, ताबडतोब अर्ज करा..

जळगाव लाईव्ह न्यूज | नोकरी संदर्भ | बँकेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती जाहीर करण्यात आलेली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर या पदांसाठी ही भरती होईल. तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in द्वारे या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. ३ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतो. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ६०६ पदे भरण्यात येणार आहेत. Union Bank of India SO Bharti 2024

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मुख्य व्यवस्थापक-आयटी – 05 पदे
शैक्षणिक पात्रता :
B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / आयटी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
2) वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी – 42 पदे
शैक्षणिक पात्रता
: B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / आयटी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
3) व्यवस्थापक-आयटी – 04 पदे
शैक्षणिक पात्रता :
B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / आयटी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी
4) व्यवस्थापक – 447 पदे
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही विषयात पदवीधर
(SC/ST/OBC/PwBD – 55%)
5) सहायक व्यवस्थापक – 108 पदे
शैक्षणिक पात्रता :
B.E./B. टेक. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये (किमान 60% गुण) (SC/PwBD – 55%)

इतके भरावे लागेल अर्ज शुल्क
सामान्य/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 850 रुपये भरावे लागतील. तसेच, SC/ST/PWBD उमेदवारांना 175 रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीत ऑनलाइन परीक्षा, गट चर्चा, अर्ज स्क्रीनिंग आणि/किंवा अर्ज आणि पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असू शकतो.

अर्ज कसा करावा
युनियन बँक unionbankofindia.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवरील रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा.
“Union Bank Recruitment Project 2024-25 (Specialist Officer)” असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
अर्ज भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा.
फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा