⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगाव शहरातील फलकांवर येणार ‘युनिफॉर्म’

जळगाव शहरातील फलकांवर येणार ‘युनिफॉर्म’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ हे घाेषवाक्यापुरते उरलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. आपले शहर सुंदर असावे यासाठी प्रत्येक शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर शासनाने जबाबदारी टाकली आहे. शहर सुंदर दिसावे म्हणून स्वच्छतेसह साैंदर्यीकरणाचे अभियान राबवण्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले आहेत. त्यानुसार आता शहरातील दुकानांच्या पाट्या, दिशादर्शक फलकांनाही ‘युनिफाॅर्म’ असणार आहे. कारण त्यामुळे एकसारखेपणा आणि एकसारखी रंगसंगती येण्यास खऱ्या अर्थाने मदत हाेणार आहे.

शहराच्या साैंदर्यीकरणासाठी नगरविकास विभागाने सर्व शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अभियान राबवण्याबाबत सुचवले आहे. यासाठी स्थानिक पातळीवर कार्यगटांची निर्मिती करावी लागणार आहे. महापालिकेचे आयुक्त, शहर अभियंता, नगररचनाकार, आराेग्य अधिकारी, बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी, शहरातील वास्तुविशारद, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांना या अभियानात सहभागी करून घ्यावे लागणार आहे. शहर साैंदर्यीकरणासाठी या कार्यगटाने केलेल्या शिफारसीवर काम करावे लागणार आहे. त्यामुळे शहराचे साैंदर्य राखता येणार आहे.

आकाशवाणी जवळील फलक.
साैंदर्यीकरण करताना अाधी शहराची स्वच्छता करावी लागणार अाहे. त्यानंतर रस्ता दुभाजकांची रंगरंगाेटी, दुुभाजकांत शिल्प उभारणे, शाेभिवंत झाडे लावणे, शहरात रस्त्यावरील दुतर्फा भिंतीवर जनजागृतीपर चित्र रेखाटणे, शैक्षणिक संस्थांच्या भिंतीवर समर्पक भित्तिचित्र रेखाटणे, भुयारी मार्ग, अाेव्हर ब्रिज, उड्डाणपूल सुशाेभिकरण करणे, जलशये, तलाव, कारंजे, उद्यानांचे साैंदर्यीकरण करणे अादी कामे या अभियानात करावी लागणार अाहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह