मुलाला पळविण्याचा संशय, जमावाच्या बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा मृत्यू ; जळगावात खळबळ

फेब्रुवारी 24, 2026 3:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२६ । जळगाव तालुक्यातील अव्हाणेमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मुलाला पळवण्याच्या संशयावरून अनोळखी तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज २४ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली. याप्रकरणी पाच जणांसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

crime death 1 jpg webp

याबाबत असे की, जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनींग परिसरात सोमवार, २३ फेब्रुवारी सायंकाळी अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या फिरत असताना एका तीन वर्षीय बालकाला उचलून घेऊन जात असल्याच्या संशयावरून तिथे जमा झालेल्या जमावाने त्या तरुणाला पकडले आणि विचारपूस न करताच बेदम मारहाण सुरू केली.

Advertisements

यावेळी अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली. यांनतर पोलीस जेव्हा लक्ष्मी जिनींगजवळ पोहोचले, तेव्हा तिथे मोठी गर्दी जमली होती आणि तो अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते आणि डोक्याला, हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या.

Advertisements

पोलिसांनी जखमी तरुणाला तातडीने शासकीय वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खु.), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, सध्या रा. सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद, ता. यावल) आणि अफताब आरिफ खाटीक (रा. जळगाव) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. याप्रकरणी पाच जणांसह इतर अनोळखी लोकांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now