जळगाव जिल्हारावेर

निंभोरा येथे अज्ञात इसमाने दोन गाड्यांच्या फोडल्या काचा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील निंभोरा येथील प्रतिष्ठित किराणा दुकान असलेल्या नरेंद्र ढाके यांच्या मालकीच्या दोन माल वाहतूक गाड्यांच्या काचा फोडून अज्ञात इसमाने नुकसान केल्याची घटना काल रात्री उघडीस आली. दरम्यान या प्रकरणी कारवाई व्हावी अशी अपेक्षा ढाके यांनी व्यक्त केली.

येथील बस स्टँड शेजारी असलेल्या प्रसिद्ध किराणा व्यापारी नरेंद्र ढाके यांच्या टाटा ४०७ व पिकअप अशा दोन मालवाहतूक करणाऱ्या गाड्या त्यांच्याच मालकीच्या प्लॉटमध्ये लावलेल्या होत्या. त्या गाड्यांच्या काचांवर अज्ञात इसमाने विटा व दगड ड्रायव्हर साईटने मारून काचा फोडून नुकसान केले. विशेष म्हणजे नरेंद्र ढाके यांच्या प्लॉट मध्ये इतर ग्रामस्थांची वाहने ही असतांना त्यांना कुठलेही नुकसान न करता नरेंद्र ढाके यांच्याच वाहनांचे नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती कळताच सकाळी निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, पोहेकॉ विकास कोल्हे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी, सुनील कोंडे, भास्कर महाले, रोहिदास ढाके, कुंदन ढाके, कुंदन धांडे, राजीव बोरसे आदिंनी घटनास्थळी पाहणी केली. याबाबत निंभोरा पोलिसांत नरेंद्र नामदेव ढाके यांच्या तक्रारीची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ कोल्हे करीत आहेत.दरम्यान याच भागात या आधी सुद्धा सुभाष मोरे यांच्या वाहनांचे ही काचा फोडून नुकसान करण्यात आले होते. याठिकाणी मोकळ्या परिसरात मदयपींचा वावर असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील रहिवाशी यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button