दुर्दैवी : तापी नदीपात्रात इलेक्ट्रिक मोटरचे काम करताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

ऑक्टोबर 3, 2022 1:03 PM

Raver NEws-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील पुरी गोलवाडे शिवारातील तापी नदी पात्रात २४ वर्षीय तरुणचा इलेक्ट्रिक मोटरचे काम करताना शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी निंभोरा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

jalgoan 22 jpg webp

शुभम विजय गोंड वय (२४) असे मयत तरुणीचे नाव आहे. १ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ५.०० वा.च्या सुमारास गोंड हा युवक इलेक्ट्रिक मोटर चे काम करीत असताना अचानक शॉक लागून पाण्यात पडला. रविवारी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्र्वर बेलदार यांनी पाण्यात उतरून सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिस पाटील किरण पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यू २१/२२ सीआरपीसी १७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

ग्रामीण रुग्णालय रावेर येथे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. निंभोरा पोलिस स्टे.चे स.पोनि श्री.गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे का.गणेश सुर्यवंशी,पोलिस नाईक ईश्वर चव्हाण हे करीत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now